नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २३६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

संपादक सुशील पाटील +919765199555

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २३६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

मुंबई, दि. ४ : नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सन २०२६-२७ च्या सुमारे २३६.०७ कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. तसेच प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रस्तावित नाशिक रिंगरोड (परिक्रमा मार्ग)च्या लगतच्या दोन्ही बाजूस टप्प्याटप्प्याने नगर रचना योजनेच्या माध्यमातून बाह्य वळण रस्ता प्रभाव क्षेत्र म्हणून विकसित करण्यासही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

ऊए

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किशोर दराडे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एनएमआरडीएचे महानगर आयुक्त जलज शर्मा आदी उपस्थित होते. श्री. शर्मा यांनी अर्थसंकल्प सादर केला..

यावेळी सन २०२५-२६ च्या सुमारे ४५४.५ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पासही यावेळी मान्यता देण्यात आली. यावेळी एनएमआरडीएच्या कार्यालयासाठी स्वतःची इमारत खरेदी करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या भूखंड विल्हेवाट नियमावली व जाहिरात फलक धोरणास मंजुरी देण्यात आली. तसेच शासकीय जमिनींच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार संस्था नेमणे, तसेच विकास योजनांअंतर्गत जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी अदा करण्यास मंजुरी देण्यात आली.

नाशिक महानगर प्रदेशाच्या प्रभावी नियोजन व विकास मार्गदर्शनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इन अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईन तसेच इतर नगर रचना क्षेत्रातील शासकीय मान्यता प्राप्त संस्थांना ज्ञान भागीदार म्हणून नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंजुरी दिली. यावेळी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दवाढीसंदर्भातही चर्चा झाली.

सुशील पाटील

सदरील जनहित महार्दपण मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र नाशिक राहिल. संपादक - सुशील पाटील +91 9765199555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!