नाशिकमुंबई

मोदींच्या नेतृत्वात पश्चिम बंगालचा  सोनार बंगला होणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सपादक सुशिल पाटील

मोदींच्या नेतृत्वात पश्चिम बंगालचा  सोनार बंगला होणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा
मुंबई –  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जनतेत लोकप्रिय असून पाच राज्यांच्या निकालात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पाच राज्यांच्या निवडणुक निकालात भाजपचा महाविजय झाला असून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. या विजयाचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा करिष्मा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दिसला आहे. मोदींच्या नेतृत्वामुळे पश्चिम बंगालचा यापुढे सोनार बंगला होईल अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी  विधानसभा निवडणुक निकालावर दिली आहे. त्यांनी भाजप च्या सर्व शीर्ष नेत्यांचे अभिनंदन केले आहे.
आठवले
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपचा दणदणीत विजय झालेला आहे. पाँडेचेरीमध्ये सुध्दा भाजप एनडीएचा विजय झालेला आहे. आसाम, पाँडेचेरी आणि पश्चिम बंगाल मध्ये भाजपला भव्य विजय मिळालेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या नितीनुसार देशात विकासाचे वादळ उभे राहीले आहे. जनतेमध्ये नरेंद्र मोदींचे नेतृत्व लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जिद्दीने निर्णायक निवडणुक लढली .या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस चा दारुण पराभव झालेला आहे. ममता बॅनर्जीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज निर्माण झाले होते. पश्चिम बंगालमधील जनतेने नरेंद्र मोदींच्या विकासाला आपले अमुल्य मत दिले आहे. मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा येथे सिध्द झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत पश्चिम बंगालची झालेली दुरावस्था मोदींच्या आणि भाजपच्या नेतृत्वातील सरकार दुर करेल आणि पश्चिम बंगालचा हमार सोनार बंगला असा  गौरवपूर्ण सोनेरी विकास पश्चिम बंगालचा होईल असा आम्हाला विश्वास आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले. 
पश्चिम बंगालमध्ये विकासाचे वारे वाहतील, पश्चिम बंगालमधील जनतेने तृणमृलच्या गुंडशाहीच्या राजकारणातून आता सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये आता शांती, समृध्दी आणि विकासाचे वारे वाहतील.पश्चिम बंगाल चा सोनार बंगला  असा गौरव  पुन्हा मिळेल असे विकसीत राज्य पश्चिम बंगाल होईल असा आपल्याला विश्वास आहे असे ना.रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

सुशील पाटील

सदरील जनहित महार्दपण मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र नाशिक राहिल. संपादक - सुशील पाटील +91 9765199555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!